Breaking News

रक्तदानाने वाहिली “महामानवाला” आदरांजली. ,हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार आयोजक.

Advertisements
Advertisements
रक्तदानाने वाहिली “महामानवाला” आदरांजली.  
 (हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार आयोजक.)
कोरपना(ता.प्र.):-       भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून गडचांदूर येथील “हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार” तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याचे चित्र असून मोठ्याप्रमाणात रक्तदान करण्याची गरज आहे.कोरोना महामारीत सदर मित्र परिवाराने दुसऱ्यांदा रक्तदान शिबीर आयोजित केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रक्तदान शिबीराला सुरवात करण्यात आली.एकुण २६ रक्तदात्यांनी  यावेळी रक्तदान केले.जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.पवार यांच्या चमूने रक्त संकलन केले.शिबीराला पोलीस स्टेशन गडचांदूर,मनोज भोजेकर,अरविंद गोरे यांचे सहकार्य लाभले.सतीश बिडकर,महेश परचाके, सागर गुडेल्लीवार,महेश देरकर,पंकज माणूसमारे,नितीन भगत,योगेश सोंडवले, विक्की खाडे,पियुष माकोडे,नितेश डाखोरे, सचिन जगनाळे,स्वप्नील आत्राम,भाविक कुळमेथे सह इतर सदस्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *