वरोऱ्यात पोलिसांच्या नाकासमोर जनता कर्फ्युतही अवैध धंदे तेजीत.

Advertisements
Advertisements
वरोऱ्यात पोलिसांच्या नाकासमोर जनता कर्फ्युतही अवैध धंदे तेजीत.
वरोरा,   आलेख रट्टे –
चंद्रपूर जिल्ह्यात लाॅकडाउन मधे सर्वच व्यवसाय बंद राहणार असे मा.अजय गुल्हाने जिल्हाअधिकारी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आदेश काढले होते त्यात अति जीवनावश्यक वस्तू सेवा किराणा,मेडिकल,भाजीपाला,पेट्रोल पंप, दवाखाणे चालू राहतील बाकी सर्वच बंद राहील मात्र वरोरा शहरात याच्या विरुद्ध परिस्थिती बघावयास मिळत आहे.वरोऱ्यात सर्वीकडे पूर्ण मार्केट बंद आहे मात्र अवैध धंदेवाले तेजीत आहे.50 रु.चा देशीचा पौवा 200 रु.च्या घरात पोहचला आहे व शहरात प्रत्येक भागात मुबलक प्रमाणात अवैध दारूचा पुरवठा केल्या जात आहे.हा सर्व खेळ पोलिसांच्या नाका समोर चालत असल्याने आपण समझु शकतो की ‘ कोयले के धंदे मे हात काले ! ‘ काही अशी अवस्था वरोरा पोलिसांची आहे.शहरात सर्वी कडे छोटे व्यावसायिक पासून तर मोठे व्यवसायिक आपली दुकाने बंद करून कोरोंनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला मदत करीत आहे.मात्र प्रशासनाच्या नियमाला बगल देण्याचे काम अवैध दारू विक्रेते करीत आहे.शहरातील प्रत्येक गल्ली मध्ये अवैध दारू विक्रेते तैयार झाले ते पोलीस विभागाच्या आशीर्वादाणे अशी नागरिकांतून आता ओरड सुरू झाली आहे.या आगीदारचे ठाणेदार उमेश पाटील यांच्या बाजीरावच्या धाकाने चांगले चांगले अवैध दारू विक्रेत्यांनी अवैध दारू विक्री पासून हाय तौबा केला होता मात्र नवीन ठाणेदार आल्या पासून अवैध दारू विक्रीला सुगीचे दिवस आल्याचे अवैध दारू विक्री करणाऱ्याकडून बिनधास्त बोलल्या जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व निलेश पांडे पोलीस उप विभागीय अधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष देऊन वरोर्यातील अवैध दारू वर अंकुश आणावा अशी मागणी जनता करीत आहे.
Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *