Breaking News

घरीच साजरा करा, प्रभू रामाचा जन्मोत्सव, उत्सवाचा फोटो अपलोड करा महानगर भाजपाचे आवाहन.

Advertisements
Advertisements
घरीच साजरा करा, प्रभू रामाचा जन्मोत्सव, उत्सवाचा फोटो अपलोड करा
महानगर भाजपाचे आवाहन.
राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना चंद्रपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ अंकी झाला आहे.अश्यात नागरिकांनी विषेश काळजी घेत प्रभूरामाचा जन्मोत्सव घरीच साजरा केला पाहिजे.घरी साजरा करण्यात आलेल्या उत्सवाचे फोटो किंवा *सेल्फी विथ श्री राम*” करून त्याचे फोटो किंवा व्हीडिओ क्लिपस् फेसबुक(सोशल मीडिया)वर अपलोड करा,असे आवाहन महानगर भाजपा महानगर जिल्हाअध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.
दरवर्षी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.येथील काळा राम मंदिरात दुपारी 12 वाजता रामजन्म उत्सव झाल्यावर भव्य शोभायात्रा देखील काढली जाते.परंतु या परंपरेला 2019 पासून कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.यंदा कोरोनाची स्थिती पूर्वीपेक्षाही बिकट आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराच्या बाहेर न निघता घरीच रामजन्म उत्सव करून,कोरोना संपण्यासाठी प्रभू श्री राम चरणी प्रार्थना करावी,असे आवाहन भाजपा तर्फे करण्यात आले.या उत्सवासाठी माजी वित्त मंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,सर्व महामंत्री,सचिव,उपाध्यक्ष व इतर पदाधिकारींनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *