केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातुन वर्धा जिल्हयातील रुग्णालयाकरिता 15 मिनी व्हेंटीलेटर व 1 व्हेंटीलेटर प्राप्त.

Advertisements
Advertisements

केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नातुन वर्धा जिल्हयातील रुग्णालयाकरिता 15 मिनी व्हेंटीलेटर व 1 व्हेंटीलेटर प्राप्त.

वर्धा: विदर्भात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची मागणी वाढते आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्हयाकरिता मोठी मदत केली आहे.  विदर्भातील सर्व जिल्हयातील रुग्णालयाकरिता केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी मीनी व्हेंटीलेटर व व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिलेले आहे. यामधुन वर्धा जिल्हयाकरिता रुग्णालयाकरिता 15 मिनी व्हेंटीलेटर व 1 व्हेंटीलेटर प्राप्त झाले आहे. यातील सामान्य रुग्णालय येथे 8 मिनी व्हेंटीलेटर, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे 4 मिनी व्हेंटीलेटर, उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे 3 मिनी व्हेंटीलेटर व सावंगी रुग्णालयात 1 व्हेंटीलेटर देण्यात येणार आहे.

     दिनांक 22/04/2021 ला भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हयाच्या वतीने वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस व भाजपा जिल्हाध्यक्ष डॅा. शिरीष गोडे यांनी सामान्य रुग्णालय 8 मिनी व्हेंटीलेटर व सावंगी रुग्णालयात 1 व्हेंटीलेटर सुपूर्द केलेे.यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॅा सचिन तडस व संबधीत वैद्यकीय अधिकारी, तसेच सावंगी मेघे येथे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

    हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालकरिता 4 मिनी व्हेंटीलेटर खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष डॅा. शिरीष गोडे, आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी भाजपा महामंत्री किशोर दिघे, जि.प. गटनेता राजेश मडावी उपस्थित होते.

    जिल्हयात कोविड संसर्ग झपाटयाने वाढत आहे, त्यामानाने आरोग्य व्यवस्था कमी पडत आहे. जिल्हयात आॅक्सीजन व व्हेंटीलेटरचा तुटवडा आहे, केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी वर्धा जिल्हयातील रुग्णांना मदत व्हावी या दृष्टीकोनातुन 15 मिनी व्हेंटीलेटर व 1 व्हेंटीलेटर दिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, जिल्हयात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोविड-19 उपचाराकरिता सर्वसोई सुविधा युक्त अधिक खाटाची व्यवस्था करनेही आवश्यक असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *