Breaking News

श्‍वेता रुग्णालयावर कारवाई करा   – खा. धानोरकरांची मागणी

Advertisements
Advertisements

श्‍वेता रुग्णालयावर कारवाई करा
  – खा. धानोरकरांची मागणी
चंद्रपूर,
चंद्रपूर शहरातील कोविड सेंटर असलेल्या श्‍वेता रुग्णालयाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. त्यामध्ये 1 लाख रुपये जादा आकारणार असल्याचे डॉक्टराने चक्क रुग्णांच्या नातेवाईकाला सांगितले आहे. ही बाब समाजमाध्यमातून समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, यावर कारवाई करा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पोलिस अधीक्षक साळवे यांच्याकडे केली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने गोरगरीब जनता, सर्वसामान्य कुटुंबियांची मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात घरातील किमती वस्तू विकून कुटुंबातील सदस्यांवर उपचार करत आहे. परंतु, जीवनात आजवर कमावलेली संपत्ती विकायची त्यांच्यासमोर वेळ आली आहे. त्यात खासगी रुग्णालयातील काही डॉक्टर अवाच्या सव्वा बिल आकारात आहे. त्यामुळे करायचे काय, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेसमोर पडला आहे. यावर नियंत्रण करायच्या सूचना खा. बाळू धानोरकर यांनी दिल्या आहे. त्यासोबतच अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या सूचनादेखील त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिल्या आहे.
त्यासोबतच अशा तक्रारी अनेक रुग्णालयामधून प्राप्त होत असून, शासकीय दराव्यतिरिक्त अवाजवी आकारणी करणारे कोविड सेंटर्स, स्कॅन सेंटर्स यांनी शासन निर्धारित दराचे दरफलक दर्शनी भागात त्वरित लावावे व या कामी लावलेली संबंधित सरकारी अधिकार्‍याच्या चमूने यांची अंमलबजावणी करून घ्यावी, अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीच्या वेळी केली.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत नारखेडकर, उपविभागीय अधिकारी घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड, डॉ. लोढा, डॉ, लिमजे, डॉ, जुमनाके, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, बसंत सिंग यांची उपस्थिती होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पे रोल वरील सर्व प्राध्यापक व विभागप्रमुख यांची यादी मागवून त्यांना कोरोना रुग्णाच्या कोणत्या जबाबदार्‍या वाटप झाल्यात याबाबत माहिती घेऊन कडक कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी या बैठकीत केली.

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *