Breaking News

जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक , नागरिकांनी  खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी

Advertisements
Advertisements

जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक

Ø नागरिकांनी  खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी

         वर्धा, दि.4 (जिमाका): कोरोना आता लवकरच थर्ड  स्टेजला पोहोचेल आपण सगळयांनीच आता अति दक्षता पाळायची आहे आहे. शेजारी जाणे बंद, गरम पाणी पिणे , ब्रेड पाव बेकरी सामान बंद,  बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेऊ नये अशा स्वरुपाचा संदेश  जिल्हाधिकारी  प्रेरणा देशभ्रतार  यांच्या नावे  सोशल मिडियावर  पसरवून  नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचे काम सुरु आहे. मेसेजखाली जिल्हा माहिती कार्यालय असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र असा कुठलाच संदेश  जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने प्रसिध्द करण्यात आलेला नसून  ही पोस्ट  फेक असून नागरिकांनी अशा खोटया अफवांवर  विश्वास ठेवू नये व पुढे पाठवू नये असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले  आहे.

    गैरसमज व भीती  पसरविणा-या पोस्ट  टाकणा-यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार  यांनी दिले आहेत. करोना संक्रमण काळात लोंकामध्ये भीती  व गैरसमज  पसरवणा-या अन्य पोस्टवरही  नजर ठेवण्याची कार्यवाही सायबर सेलकडून करण्यात येत आहे.

          राज्य शासनाच्या  व जिल्हा प्रशासनाच्या कोव्हिड प्रोटोकॉल सूचनेशिवाय  जिल्हा माहिती कार्यालयाकडून  असे कोणतेही वृत्त प्रकाशित  केले जात नाही. सदर फेक मेसेजचा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंध  नाही, असे जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी म्हटले आहे.   

       फॉरवर्ड करतांना विचार करा!

       इंटरनेटच्या स्वरुपात आता प्रत्येकाकडे  अधिक प्रभावी माध्यम आले आहे. सोशल मिडियाची  ही ताकद  असून  त्याचा मोठया प्रमाणात दुरुपयोगही होतांना दिसत आहे.  काही समाजविघातक प्रवृत्ती सक्रिय  झाल्या  आहेत.  त्यामुळे  सोशल मिडियावर आलेला  प्रत्येक मेसेज खात्री  करुनच फॉरवर्ड करावा असे आवाहन   प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *