जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध

Advertisements
Advertisements

 

जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध

Ø होम आयसोलेशनची सुविधा  नसणाऱ्या नागरिकांसाठी व्यवस्था

Ø गृहवीलगकरनात असताना बाहेर फिरणाऱ्यांना ठेवणार संस्थात्मक विलगिकरणात

       वर्धा, दि 5 (जिमाका):-  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णाचे गृह विलगिकरण करण्यात येते, मात्र अनेक रुग्णांच्याकडे गृह विलगिकरणासाठी आवश्यक ती वेगळ्या खोलीची व स्नानगृहाची उपलब्धता नसल्यामुळे

एका रुग्णामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत असल्याचे आढळून येत आहे. अशा रुग्णासाठी जिल्हा प्रशासनाने  जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात 17 ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले असून येथे 1 हजार 6 बेड उपलब्ध आहे. त्याचबरोबर कोविड बाधित असतानाही बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींचे सुद्धा यापुढे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे.

        जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात तीन कोविड केअर सेंटर सुरू होते. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आणखी सहा केंद्र सुरू करण्यात आलेत. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आता  जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 6443  ऍक्टिव्ह कोरोना बाधित आहेत. त्यापैकी 903 रुग्ण 5 कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत तर कोविड केअर सेंटर मध्ये 81 रुग्ण असून  5459 रुग्ण गृह विलगिकरणात आहेत.

         अनेक गावांमध्ये कुटुंबातील एक सदस्य बाधित झाल्यावर पूर्ण कुटुंब कोरोना बाधित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. घरातील अति जोखमीचे रुग्णही अशावेळी लवकर बाधित होऊन त्यांची प्रकृती गंभीर होते . नंतर रुग्णालयात भरती होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गृह विलगिकरणात राहतांना वृद्ध, अति जोखमीचे रुग्ण असल्यास त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात स्नानघर जोडून असलेली हवेशीर खोली असण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अशी स्वतंत्र व्यवस्था नसलेल्या कुटुंबाकरिता कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. गृह विलगिकरणाची व्यवस्था नसणाऱ्या नागरिकांनी कोविड केअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच गृह विलगिकरणात असताना  बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींना आता सक्तीने संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात येणार आहे.

       अति जोखमीच्या कोरोना बाधित रुग्णांना आता गृह विलगिकरणाऐवजी संस्थात्मक विलगिकरणाचा पर्याय निवडता येणार आहे. कोविड केअर सेंटर मध्ये त्यांच्यावर योग्य उपचार व देखरेख करण्यात येईल. तसेच प्रकृती गंभीर होत असल्यास अशा रुग्णांना तात्काळ रुग्णालयात हलविणे व भरती करणे सोपे होईल.

कोविड केअर सेंटर व बेडची उपलब्धता

1 राजगुरू वसतीगृह हिंदी विद्यापीठ उमरी मेघे -110

2 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आय टी आय टेकडी  वर्धा -30

3आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह,  आय टी आय टेकडी, वर्धा -30

4 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, आय टी आय टेकडी, वर्धा -20

5  अनुसूचित जातीच्या मुलांची शासकीय निवासी शाळा, आय टी आय टेकडी, वर्धा – 44

6 मागासवर्गिय मुलांची शासकीय वसतिगृह, आय टी आय टेकडी, वर्धा -32

7 आशिर्वाद मंगल कार्यालय, पोलीस मुख्यालय, वर्धा – 20

8 यात्री निवास, सेवाग्राम, वर्धा (सशुल्क)- 168

9 महात्मा गांधी आयुर्वेद महाविदयालय, सालोड (हि), वर्धा (खाजगी) – 100

10 मागासवर्गिय मुलांचे शासकीय वसतिगृह, देवळी – 100

11 अनुसूचित जातीच्या मुलींचे शासकीय वसतिगृह, पुलगांव-  50

12 अनु. जातीच्या मुलांचे शासकीय निवासी शाळा,हैबतपूर ता.आर्वी- 80

13 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, जनतानगर, आवी – 25

14  शासकीय माध्यमिक आश्रम शाळा – मुलींचे वस्तीगृह,पांढुर्णा ता.आष्टी – 40

15  आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह,   कारंजा – 30

16 आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगणघाट- 35

17 म्हाडा ईमारत क्र.१, हिंगणघाट – 92

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *