पालकमंत्री  ना. वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements
Advertisements

पालकमंत्री  ना. वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि. 9 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 10 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि.10 मे 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर वरून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह,चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात अधिकाऱ्यांसमवेत कोविड आढावा बैठक.

दुपारी 12:00 वाजता  चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे इतर मागासवर्गीय मुला-मुलींचे स्वतंत्र वस्तीगृह बांधकाम करण्यासाठी व जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा भूमापक अधिकारी, उपायुक्त समाज कल्याण, आयुक्त मनपा, मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद ब्रह्मपुरी, उपविभागीय अधिकारी चंद्रपूर व ब्रह्मपुरी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा बैठक. दुपारी 1:30 ते 2:00 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 2:00 वाजता चंद्रपूर वरून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 3:45 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व कोविड विषयक आढावा बैठक. सायंकाळी 6:00 वाजता ब्रह्मपुरीवरून नागपूरकडे प्रयाण करतील.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *