वर्ध्यात 37 मोकाटांवर कारवाई; 23 हजारांचा दंड

Advertisements
Advertisements

वर्ध्यात 37 मोकाटांवर कारवाई; 23 हजारांचा दंड
वर्धा-
प्रशासनाच्या वतीने कडक निर्बंधांंच्या अंमलबजावणीला कालपासून सुरूवात झाली. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला. विनाकारण रस्त्यावरुन फिरणार्‍यांवर कारवाई तर प्रसंगी पोलिसांनी दंडुक्याचा प्रसादही दिला जात आहे. आज रविवार 9 रोजी पुन्हा मोकाट फिरणार्‍या 37 जणांवर कारवाई करत 18 हजार 500 तर एका बोरवेल गाडीवर 5 हजारांचा असा 23 हजार 500 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. पहिल्या दिवशी पोलिसांनी दिलेल्या प्रसादाची धास्ती घेतल्याने आज शहरातील बहूतेक रस्त्यांवर सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळाला.
कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 13 पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी वगळता इतर कारणांसाठी बाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले आहे. विनाकारण फिरणार्‍यांवर अंकूश रहावा यासाठी शहराच्या प्रवेश द्वारावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला तर प्रमुख चौकात बॅरिकेटस लावून नाकाबंदी करण्यात आली. पोलिस, पालिका तसेच महसूल विभागाची पथके उल्लंघण करणार्‍यांवर कारवाईसाठी शहरात गस्त घालत होती. उल्लंघण करणार्‍या 37 जणांवर दंडात्मक कारवाई करत 18 हजार 500 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. तर दिवसभर बहुतांश ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. ग्रामीण भागातही नागरिकांकडून निर्बंधांचे पालन करण्यात येत असल्याचे दिसत होते. मात्र काही अपवादही आढळत होते. निर्बंधांमुळे अनेकांच्या अडचणीत भर पडली. अनेकांकडे ओळखपत्राचा अभाव दिसत होता. ओळखपत्र घरी राहिल्याने पोलिसांना उत्तरे देताना अडचणी येत होत्या. पोलिसांकडून चौकांमध्ये कसून विचारपूस करण्यात येत होती.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *