Breaking News

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements
Advertisements

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

      चंद्रपूर, दि.13 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि.15 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 15 मे 2021 रोजी सकाळी 8.00 वा. कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वा. शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11:00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खरीप आढावा बैठकीस उपस्थिती.

दुपारी 12:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील,वीस कलमी सभागृह येथे कोविड-19 व म्युकोरमायकोसिस संदर्भात आढावा बैठक घेतील. दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील, वीस कलमी सभागृहात कोविड-19 संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आलेल्या व करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी 1:30 ते 2:30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 3:30 वाजता चंद्रपूर येथून सिंदेवाहीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:45 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6:00 वाजता सिंदेवाही येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 7:00 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व मुक्काम.

रविवार, दि.16 मे 2021 रोजी, सकाळी 10:00 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे कोविड विषयक आढावा बैठक घेतील. सायंकाळी 4:00 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ,नागपूर येथे आगमन व मुक्काम.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *