Breaking News

हॉटेल व्यवसायिकाची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या?

Advertisements
Advertisements

हॉटेल व्यवसायिकाची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या?

भद्रावती प्रतिनिधी :- कोरोना संक्रमण झालेल्या व त्यामुळे रुग्णालयाच्या फी आणि औषधी खर्च याच्या बोझ्याखाली दबून आता आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यात व्यवसायिकांचे लॉक डाऊन मधे आर्थिक कंबरडे मोडले असल्याने हॉटेल भाजीपाला व इतर दुकानदार यांचे मनोधैर्य खचल्याने ते आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारत आहे अशीच एक घटना भद्रावती शहरातील गौतम नगर इथे घडली असून कोरोना मुक्त होऊन घरी परतल्यानंतर अगदी दोन दिवसानी राजू नामदेव पिपराडे या हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोना च्या लढाईत जिंकून घरी आलेल्या या हाटेल व्यवसाईकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून जिथे कोरोना युद्ध जिंकले तिथे स्वतःला मात्र आर्थिक विवंचना जगू देत नाही म्हणून स्वतःच्या जीवनात हार पत्करून स्वतःला संपवले. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. राजू नामदेव पिपराडे वय 52 वर्ष राहणार गौतम नगर असे इसमाचे नाव असून या हॉटेल व्यवसायीकाला कोरानाची लागण झाल्याने तो भदावती मधे उपचार घेत होते अगोदरच लॉक डाऊन त्यात कोरोना चा वैद्यकीय खर्च यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या राजू नामदेव पिपराडे यांना जणू जगण्याचे साधनच समोर दिसत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. आता या लॉक डाऊन चा कालावधी पुन्हा वाढला तर जेवढे कौरौना वे मरणार नाही तेवढे उपवासी रहावं लागत असल्याने लोकांचे जीव जातील अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *