Breaking News

जागेच्या वादातून काकाची हत्या,आरोपीस अटक

Advertisements
Advertisements

जागेच्या वादातून काकाची हत्या
  – आरोपी पुतण्यास अटक, गुंजेवाही येथील घटना
सिंदेवाही-
जागेच्या वादातून रागाच्या भरात पुतण्याने सख्या काकाची हत्या केली. ही घटना शुक्रवार, 14 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पसार झालेल्या पुतण्यास सिंदेवाही पोलिसांनी रात्री अटक केली. मारोती गोविंदा वाढई असे मृतकाचे नाव आहे.
दीपक वाढई असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मागील काही दिवसांपासून पुतण्या-काकामध्ये घराच्या जागेचा वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी पुन्हा त्यांच्या कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, रागाच्या भरात आरोपीने काकास जबर मारहाण केली. मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. जखमीला तात्काळ उपचारार्थ सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात आणत असताना मारोती वाढई याचा वाटेतच मृत्यू झाला.
याप्रकरणाची पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपीविरूद्ध भादंवी 302 कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *