Breaking News

फिटनेस हब जिमवर कारवाई; १५ हजारांचा दंड

Advertisements
Advertisements
फिटनेस हब जिमवर कारवाई; १५ हजारांचा दंड

चंद्रपूर, ता. १९ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १९) फिटनेस हब जिम येथे कारवाई करून १५ हजारांचा दंड आकारण्यात आला.
सरकारनगर येथील राधिका सभागृहाजवळील फिटनेस हब जिम कोरोना नियमांचे उल्लंघन करून सुरु असल्याची माहिती मिळाली. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या नेतृत्वात झोन क्रमांक ३चे मुख्य स्वच्छता निरीक्षक आणि सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत धाड घालून कारवाई करण्यात आली. येथे तरुण-तरुणी जीममध्ये आढळून आले. या प्रकरणी जिमविरुद्ध कारवाई करून १५ हजारांचा दंड आकारण्यात आला. 

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *