चंद्रपूर, ता. २१ : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. २१) चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, नगर सचिव कवडू नेहारे, माहिती अधिकार विभागातील लिपिक गुरुदास नवले आदींनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या निमित्ताने मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहिष्णुता व अहिंसेच्या मार्गावर निष्ठेने चालण्याची प्रतिज्ञा घेतली.

मनपा मुख्यालयात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना अभिवादन
Advertisements
Advertisements
Advertisements