Breaking News

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांकडून २५ हजाराचा दंड वसूल , मास्क न घालणाऱ्यांवर सुद्धा मनपाची कारवाई

Advertisements
Advertisements
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांकडून २५ हजाराचा दंड वसूल

मास्क न घालणाऱ्यांवर सुद्धा मनपाची कारवाई

चंद्रपूर, ता. २५ : कोरोना काळात सर्वांनी नियमांचे पालन करा, असे आवाहन मनपातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरी सुद्धा शहरातील काही प्रतिष्ठाने तसेच नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. आशा प्रतिष्ठानांवर सोमवारी (ता. २४) मनपाने कारवाई करून २५ हजाराचा दंड वसूल केला. तसेच शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करून ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, सुरक्षा अधिकारी राहुल पंचभुते व त्यांची चमू तसेच झोन क्र. २ चे कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. 

झोन क्र. २ अंतर्गत कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत ठक्कर दुकान, नितीन ठक्कर, आणि इमाम पान सेंटर यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन एकुण २५ हजारांचा तसेच मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून ३ हजार असे एकूण २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *