Breaking News

जनसेवेसा ठी तत्पर राहा- आ.मुनगंटीवार 

Advertisements
Advertisements

* भाजयुमोतर्फे 14 आरोग्य मार्गदर्शन केंद्रांचे उद्घाटन

चंद्रपूर-
आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जनसेवेसाठी राहण्याचे आवाहन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आज सात वर्षे पूर्ण होत असल्याने आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य विषयक कार्यक्रमाचे मोठ्या संख्येत आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या 14 आरोग्य मार्गदर्शन केंद्राचे प्रातिनिधिक उद्घाटन त्यांच्या हस्ते रविवारी दुपारी 1:30 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथून पार पडले.

लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता या मार्गदर्शन केंद्रात कोरोना, म्युकरमायकोसिस, लसीकरण, तसेच अन्य कोणत्याही आरोग्य विषयक समस्येवर मदत व योग्य माहिती युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वेगवेगळ्या तालुक्यातील केंद्रावरील युवा मोर्चाचे स्थानिक पदाधिकारी फोनच्या माध्यमातून सेवा देणार आहे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक डीजी-बीजेपी अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, भाजपा कामगार आघाडी प्रदेश महासचिव अजय दुबे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा महामंत्री विवेक बोडे, जिल्हा उपाध्यक्ष मिथलेश पांडे, तालुका अध्यक्ष अजय मस्के, विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतिक बारसागडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, अनिरुद्ध भालेराव, सोशल मीडिया विधानसभा संयोजक पियुष मेश्राम, रिंकु गुप्ता आदींची उपस्थिती होती.

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *