निर्जन्तुकीरणासाठी आवश्यकतेनुसार फॉगिंग मशीन खरेदी करा-रवी आसवानी

Advertisements
Advertisements
– सभापती रवी आसवानी यांचे निर्देश  
– महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा

चंद्रपूर, ता. ३१ : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी आणि निर्जन्तुकीरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार फॉगिंग मशीन खरेदी करण्यात याव्यात, असे निर्देश सभापती रवी आसवानी यांनी दिलेत. कुंदननगर भागात नियमांचे उल्लघंन करून रस्स्त्यावर मटण आणि चिकण दुकाने थाटणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेची ऑनलाईन स्थायी समिती सभा सोमवार दिनांक ३१ मे २०२१ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नविन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात पार पडली. यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, उपायुक्त विशाल वाघ यांच्यासह आभासी माध्यमातून सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

सभागृहात सर्वप्रथम दिवंगत झोन सभापती अंकुश सावसाकडे, माजी पालकमंत्री एकनाथराव गायकवाड, माजी पालकमंत्री संजय देवतळे, माजी स्वीकृत सदस्य अनिल त्रिवेदी, खासदार राजीव सातव यासह कोरोनामुळे मृत पावलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सभेत वडगांव प्रभाग क्र. ८ मधील राजनूर रेसिडेन्सीजवळील ओपन स्पेसचा विकास व सौदीकरणाचे कामाकरीता प्राप्त झालेल्या निविदादरांना तसेच भानापेठ प्रभागामध्ये सिंडीकेट बँक, माता मंदिर मागील बाजुच्या परिसरात ज्युबिली हायस्कुलजवळ व पटकोटवार यांच्याघराजवळ कॉक्रीट रस्ता बांधकामाकरिता प्राप्त झालेल्या निविदा दरांना स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली. यावेळी शहरात मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी चर्चा झाली. पाणीटंचाईच्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर वाढविण्यात याव्यात, फवारणी आणि निर्जन्तुकीरण करण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी फॉगिंग मशीन देण्यात यावी, फॉगिंग झाल्यानंतर संबंधित प्रभाग नगरसेवकांची स्वाक्षरी घेण्यात यावी, अशा सूचना समिती सदस्यांनी मांडल्या. त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश सभापती रवी आसवानी यांनी दिलेत.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *