Breaking News

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Advertisements
Advertisements

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Ø बेरोजगार युवक-युवतींनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा

चंद्रपूर दि. 3 जून: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि.4 ते 9 जून 2021 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

अशी करा स्वतःची नाव नोंदणी :

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेब पोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करावी, किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केली असेल त्या उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, किंवा प्ले-स्टोर मधून mahaswayam हे अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे व Employment वर क्लिक करावे. Employment  पृष्ठावरील job seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी / आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड ने sign in करावे. आपल्या होम पेजवरील पंडित दिनदयाल उपाध्याय job fair हा पर्याय निवडावा. चंद्रपूर जिल्हा निवडून फिल्टर बटनावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर-1 या ओळीतील ॲक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावर (vacancy Listing) वर क्लिक करावे, I Agree हा पर्याय निवडावा, शैक्षणिक पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या आस्थापना / कंपन्यांच्या रिक्त पदांना Apply बटनवर क्लिक करा.

जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगिन करून वेब पोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरिता उद्योजकांनी नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावे आणि उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट व व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमातून संपर्क साधून ऑनलाइन मुलाखत द्यावी, सोबतच ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्य वतीने कळविण्यात आले आहे.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *