वृक्षवल्ली आम्हा सोयरे….!  जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने साईशांती नगरात वृक्षारोपण.

Advertisements
Advertisements
वृक्षवल्ली आम्हा सोयरे….!
जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने साईशांती नगरात वृक्षारोपण.
कोरपना(ता.प्र.) :-
          कोरोना महामारीत आक्सीजन अभावी कित्येकांचे जीव गेले.मानवी जीवनात आक्सिजनचे महत्व  कदाचित याकाळात सर्वांनी अनुभवलेच असावे यात दुमत नाहीच. लोकवस्ती व इतर विकास कामांसाठी जंगल कटाई मोठ्याप्रमाणात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.यामुळे वृक्ष लागवड कमी आणि कटाई जास्त असे चित्र असून नैसर्गिकरीत्या मोफत मिळणारे आक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे.आक्सिजन व्यतिरिक्त कित्येक वृक्ष विविध प्रकारच्या औषधांसाठी सुद्धा कामी येते.मात्र सध्याच्या आधुनिक युगात मानवाला नैर्गिक संसाधनांचा विसर पडल्याची खंत व्यक्त होत आहे.जे आक्सिजन वृक्षांपासून मोफत मीळते ते कोरोना काळात पैशानेही मिळणे अक्षरशः कठिण होऊन बसले होते ही वास्तविकता सर्वांनी अनुभवली आहे.एकुणच वृक्षारोपण काळाची गरज बनली असून “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गडचांदूर नगरपरिषदेचे नगरसेवक अरविंद डोहे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनात येथील साईशांती नगर(टीचर काॅलोनी)येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.
   सदर कॉलनीत मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली असून यात विशेष बाब म्हणजे ज्यांच्या घरापुढे वृक्षारोपण करण्यात आले त्या कुटुंबांनी संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे.ज्यांची झाडे जगतील त्यांचा सत्कार पुढच्या वर्षी करण्यात येणार असल्याची माहीती नगरसेवक डोहे यांनी “दै.चंद्रधून” प्रतिनिधीला दिली आहे.यावेळी भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे,संदीप शेरकी,हरीश घोरे,प्रतीक सदनपवार,माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,सौ.किरण सदनपनपवार,सौ.सुवर्णा कावटकर,सौ.वर्षा आत्राम,सौ.कल्पना वरारकर,सौ.रेखा शिंदेकर,सौ.शेंडे,माजी पं.स. सभापती महेंद्र ताकसांडे,विनोद क्षिरसागर, विजय पोतनुरवार,संतोष लांडे, सुनील जोगी, दत्तु पानघाटे,ओम क्षिरसागर आदींची उपस्थिती होती.
Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *