Breaking News

मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू 

Advertisements
Advertisements

मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू 

            चंद्रपूर,दि.7 जून: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्र, जानाळा उपक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या डोणी नियतक्षेत्र-1 मध्ये 5 जून रोजीच्या विशेष निरीक्षणादरम्यान क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना सकाळी 10 वाजता वाघिण मृत अवस्थेत आढळली. सदर घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच घटनेच्या स्थळी भेट देऊन चौकशी केली. तद्नंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या एसओपी नुसार दि. 5 जून 2021 रोजी प्राथमिक उपचार केंद्र, चंद्रपूर येथे शवविच्छेदनानंतर सदर वाघिणीचे दहन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्राथमिक तपासणीनुसार,या वाघिणीचा मृत्यू  शरीरातील अंतर्गत जखमांमुळे झालेला असल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, ही वाघीण २ जून रोजी दुपारी डोणी-1चे वनरक्षक यांच्या नियमित गस्तीमध्ये डोणी गावापासून अंदाजे दीड किलोमीटर अंतरावर दाट झुडूपाखाली बसून असल्याचे दिसून आले होते. ही वाघीण न उठल्याने तिच्यावर दि.2 ते 5 जून या कालावधीत विशेष निरीक्षण ठेवण्यात आले होते. सदर वाघिणीने दि. 3 जून 2021 रोजी जलद बचाव पथकावर हल्ला केला होता. त्यानंतर दि.5 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता सदर वाघिण हि मृतावस्थेत आढळली.  याबाबतची संपूर्ण कार्यवाही चंद्रपूर,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, उपसंचालक (बफर) व सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असल्याची माहिती चंद्रपूर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे  उपसंचालक (बफर) जी. गुरुप्रसाद यांनी दिली.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *