Breaking News

कोरपना,गडचांदूरात काँग्रेसकडून “इंधन दरवाढी” चा निषेध.,केंद्र सरकार विरोधात रोष

Advertisements
Advertisements
कोरपना,गडचांदूरात काँग्रेसकडून “इंधन दरवाढी” चा निषेध.
(केंद्र सरकार विरोधात रोष)
कोरपना(ता.प्र.):-
     केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल,डिझेलच्या दरात केलेल्या अवास्तव दरवाढीच्या निषेधार्थ ७ जून रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले.याच श्रेणीत कोरपना येथील बसस्थानक व गडचांदूर येथील राजीव गांधी चौक येथे राजूराचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेस कार्यकत्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढ करून केंद्र सरकार जनतेच्या पैशांवर डल्ला मारत आहे. प्रधानमंत्र्यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा अशी एकमुखी मागणी यावेळी तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली.कोरपना येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारच्या ध्येय,धोरणांवर टीका केली.तर माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य शाम रणदिवे,माजी जि. प.सदस्य उत्तम पेचे यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आपले मत मांडले.
        गडचांदूर येथे काँग्रेस नेते तथा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हंसराज चौधरी,पापय्या पोन्नमवार,संतोष महाडोळे,गटनेता तथा सोशल मिडिया अध्यक्ष विक्रम येरणे,सभापती राहूल उमरे,बिबी ग्रा.पं.चे उपसरपंच आशिष देरकर, नगरसेवक अरविंद मेश्राम,शैलेश लोखंडे, विलास मडावी,रोहित शिंगाडे,महिला शहराध्यक्षा अर्चना आंबेकर,प्रितम सातपुते, संजय इटनकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.तर कोरपना येथे विजय बावणेसह सिताराम कोडापे,भाऊजी चव्हाण, राजाबाबू गलगट,गणेश गोडे,भारत चन्ने, कोरपना शहराध्यक्ष सुनील बावणे,मनोहर चन्ने, इस्तारी गुज्जेवार,रसूल पटेल,निसार शेख,कवडू मडावी,शेख अफज़ल,भिमरतन भगत,भारत गौरी,यश दुर्गमवार,दिपक भगत, अरूण पारखी,इसाक बेग,बाबाराव मालेकर, रोशन मरापे,विलास मडावी,स्वप्नील गभने, उत्तम गेडाम,कवडू खोबरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याचे पाहायला मिळाले.
Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *