चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र शैक्षणिक प्रगतीत चवथ्या क्रमांकावर , पायाभूत सुविधा व डिजिटल लर्नींगमध्ये राज्यात अव्वल

Advertisements
Advertisements

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र शैक्षणिक प्रगतीत चवथ्या क्रमांकावर

Ø पायाभूत सुविधा व डिजिटल लर्नींगमध्ये राज्यात अव्वल

चंद्रपूर दि.8 जून :  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रगतीमधील कार्यक्षमता, प्रतवारी दर्शक अंतरिम  अहवाल  2019-20  नुकताच घोषित करण्यात आला आहे. यात चंद्रपूर जिल्हाने संपूर्ण राज्यातून चवथ्या क्रमांक पटकावून नागपूर ,अमरावती व नाशिकसारख्या जिल्ह्यांना  मागे टाकले  आहे. याशिवाय  डीजीटल अध्ययन व शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण या मूल्यमापन घटक विषयांत मुबंई, सातारा व नाशिक या राज्यातील अव्वल तीन जिल्ह्यांना मागे टाकत राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान चंद्रपूर जिल्हयाने पटकाविला आहे .

शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, शाळांच्या दर्जाचे मूल्यमापन व्हावे व विद्यार्थ्यांची आकलनक्षमता उंचवावी हा, या दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या अहवाल कार्यक्रमामागील उद्देश आहे. या कार्यक्षमता प्रतवारी दर्शक अहवालासाठी स्त्रोतमाध्यम म्हणून  न्यास, यू -डायस, मिड-डे-मिल (मध्यान्ह भोजन योजना), शगुन, शाळासिद्धी, डायट व एनसीईआरटी आदी विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या अहवालात एकूण सहा मूल्यमापनाचे घटक कार्यक्षेत्र विचारात घेतले जात असून त्यात अध्ययन, निष्पत्ती वर्ग, आंतरक्रिया, पायाभूत सुविधा व विद्यार्थी हक्क, शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण, डीजीटल अध्ययन आणि शासकीय प्रक्रिया यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याशिवाय या अहवालात एकूण  83 मानके असून एकूण भारांश सहाशे दिलेला आहे .

 चंद्रपूर जिल्याच्या नेत्रदीपक यशामागे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले यांची प्रेरणा व मार्गदर्शन, डायटचे प्राचार्य धनंजय चाफले व प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे यांचे नियोजन व मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच जिल्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विषयतज्ज्ञ, समावेशीत शिक्षणतज्ज्ञ, केंद्रप्रमुख यांचा सातत्यपूर्ण प्रयास, अनुभव व पाठपुरावाच्या माध्यमातून जिल्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने अथक परिश्रमातून हे उल्लेखनीय यश संपादित  केले आहे.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *