Breaking News

कोरपना

गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात पत्रकारांनी एकजूट होण्याची गरज.”राजेश सोलापन” , पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात पत्रकारांनी एकजूट होण्याची गरज.”राजेश सोलापन” (पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक.) कोरपना (ता.प्र.सै.मुम्ताज़ अली:-            चंद्रपूर जिल्ह्यात हल्ली गुंडप्रवृत्तीने कमालीचे डोकेवर काढल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण नागरिकात दहशतीचे वातावरण पसरले असून वाढती गुन्हेगारी व गुंडप्रवृत्तीला ठेचून काढण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.याच पार्श्वभूमीवर काही युवकांनी चक्क पत्रकारालाच जीवे मारण्याची धमकी दिल्याची …

Read More »

आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार- राज्यमंत्री “प्राजक्त तनपुरे

आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार.              राज्यमंत्री “प्राजक्त तनपुरे” कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-           शिक्षण मानवाची मूलभूत गरज असून यामुळेच मानवाचा सर्वांगीण विकास होतो. यादृष्टीने आदिवासी भागातील शाळा सोयीसुविधांनी अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण, नगरविकास,आदिवासी कल्याण,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.ते कोरपना येथे आयोजित राष्ट्रवादी …

Read More »

डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा. ,कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना निवेदन.)

डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा. (कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना निवेदन.) कोरपना (ता.प्र.):- अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रातील डॉ.गणेश गोवर्धन शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी संबंधित आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा आशी मागणी कोरपना तालुक्यातील समस्त आरोग्य अधिकार्‍यांनी केली आहे.याविषयीचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे यांना देण्यात आले आहे.यावेळी डॉ. सुशील चंदनखेडे,डॉ.रुपाली …

Read More »

स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक., कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच

स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक. (कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच) कोरपना (ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत पुर्वीच्या कामगारांना दिलेल्या आश्वासनांनंतर सुद्धा यांना कामावर रुजू न करता परप्रांतीय मजुरांचा बिनधास्तपणे भरणा केला जात आहे.हे चित्र पाहून अन्यायग्रस्त स्थानिक कामगारांनी दालमिया सिमेंट कंपनीसमोर सहकुटुंब आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत जुन्या कामगारांना कामावर घेतले जात नाही …

Read More »

आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट.

आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट. कोरपना (ता.प्र.):-        कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा राजेंद्र काकडे हिने नुकतेच आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्र बनवून भेट दिले.आमदार सुभाष धोटे यांनी नुकतीच बिबी येथे भेट दिली असता त्यांना एका छोट्या कार्यक्रमात या तैलचित्राची भेट देण्यात आली. यावेळी कलावंत स्नेहा काकडे हिच्यासोबत तिचे …

Read More »

विकृत मानसिकतेने गाठला कळस….! ,शेत रक्षणासाठीचे कुंपण केले उदवस्त, पोलीसात तक्रार

विकृत मानसिकतेने गाठला कळस….! (शेत रक्षणासाठीचे कुंपण केले उदवस्त, पोलीसात तक्रार.)  कोरपना (ता.प्र.):-         कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभु रामचंद्र विद्यालयाचे प्राचार्य अनील मुसळे यांनी नुकतेच नांदा-बिबी लगत असलेल्या स्वतःच्या मालकीच्या शेतात जनावरांपासून होणाऱ्या नुकसानीच्या बचावासाठी सिमेंट पोल उभे करून तारेचे कुंपण केले होते.मात्र नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून पावसाळ्याचे पाणी वस्तीत शिरत असल्याने व शिवधुऱ्याची जागा न …

Read More »

झुम बराबर,झुम शराबी….! ,दारूसाठी तळीरामांची रेकॉर्डब्रेक गर्दी.सहा वर्षांनी दुकानांचे शटर अप.

झुम बराबर,झुम शराबी….!  दारूसाठी तळीरामांची रेकॉर्डब्रेक गर्दी.सहा वर्षांनी दुकानांचे शटर अप. कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-        चंद्रपूर जिल्ह्यात मागील सहा वर्षांपासून दारूबंदी लागू करण्यात आली होती.मात्र याकाळात अवैध दारूविक्रीला कमालीचे उधाण आले होते.जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पाहिजे तेवढी दारू घरपोच दारू उपलब्ध होत असल्याने ही बंदी निव्वळ कागदापुर्तीच सीमित असल्याचे आरोप नागरिकांकडून होत होते.महागडी दारू पिणे परवडत नसल्याने दारू दुकाने सुरू …

Read More »

गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.”,शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट

गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.” (शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट.) कोरपना ता.प्र.:-        कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूरची लोकसंख्या अंदाजे ४० ते ४५ हजारांच्या जवळपास आहे.या शहराला तालूक्याचा दर्जा मिळावा म्हणून मागील अंदाजे ३ दशकांपासून सतत संघर्ष सूरू आहे. परंतू नेहमीच शासनकर्ते निव्वळ आश्वासनांचे लॉलीपॉप देत असल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहे.२ जुलै …

Read More »

गडचांदूरात बसस्थानकचा मुद्दा ऐरणीवर, तालुक्यातील प्रवासी निवारे ही उध्वस्त.

गडचांदूरात बसस्थानकचा मुद्दा ऐरणीवर, तालुक्यातील प्रवासी निवारे ही उध्वस्त. कोरपना ता.प्र.:-          औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील मोठे व नावाजलेले गडचांदूर,हे दोन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर असून याठिकाणी मोठी बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,शासकीय, निमशासकीय कार्यालय,बँका असल्याने विविध कामानिमित्त मोठ्यासंख्यने नागरिक येथे येतात.परंतू या नावाजलेल्या शहरात सुसज्ज असे बसस्थानक नसल्याने हे शहर “बसस्थानक विना पोरके!” म्हटले तर वावगे …

Read More »

अखेर,दालमिया सिमेंट कंपनीतील त्या मृत तरूणानाला मिळाला न्याय. (एसडीपीओ सुशीलकुमार नायकांची कामगिरी मोलाची तर कामगारांची एकता उल्लेखनीय.)

अखेर,दालमिया सिमेंट कंपनीतील त्या मृत तरूणानाला मिळाला न्याय. (एसडीपीओ सुशीलकुमार नायकांची कामगिरी मोलाची तर कामगारांची एकता उल्लेखनीय.) कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत सध्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू असून यासाठी कंत्राटी कामगारांचा भरणा करण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर सदर कंपनीत एका ठिकाणी उंचीवर काम करीत असताना “संतोष चव्हाण” नामक २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना २९ जून …

Read More »