Breaking News

ब्रम्हपुरी

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता क्रीडामंत्री सुनील केदार यांची मान्यता मुंबई, दि, २३ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याकरिता व त्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  वडेट्टीवार यांनी आग्रहाची भूमिका घेतली. त्यांनी केलेल्या मागणीला क्रीडामंत्री सुनील केदार यांनी  २० कोटी १६ लक्ष रुपयाच्या …

Read More »

आवळगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू

आवळगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू ब्रम्हपुरी,  तालुक्यातील कुडेसावली स्मशानभूमीलगत एक मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागात खळबळ उडाली. ही घटना बुधवार, 12 मे रोजी सायंकाळी उघडकीस आली. ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रातील हळदा बिटातील कक्ष क्रमांक 1178 मध्ये हा बिबट मृतावस्थेत आढळला. कुडेसावली येथील नागरिक बुधवारी सायंकाळच्या सुमारास फिरायला गेले असता, त्यांना दुर्गंधी आली. नागरिकांनी घटनास्थळ परिसरात पाहणी केली असता, …

Read More »

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक ,चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस

चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक चंद्रपूरचे तापमान 43.8, तर ब्रम्हपुरी 42.1 अंश सेल्सिअस चंद्रपूर- विदर्भातच नव्हे, तर अख्ख्या जगात अनेकदा चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक राहिले आहे. यंदा मात्र मे महिना उजाडण्याच्या आधीच आणि कोरोनाच्या सावटात एप्रिल हिटचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागत आहे. गत तीन दिवसांपासून उन्हाचा पारा बराच चढला आहे. गुरूवारी भर दुपारी महानरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. चंद्रपूर 43.8, तर ब्रम्हपुरी …

Read More »

 बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांचा संप

 बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांचा संप ब्रम्हपुरी- राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचार्‍यांनी 15 व 16 मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात ब्रम्हपुरी येथील राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून, सोमवारी स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर सर्वांनी उपस्थित राहून विरोध प्रदर्शन केला. यावेळी राष्ट्रीयकृत बँकेच्या खाजगीकरणाला विरोध तथा सामाजिक बँकिंग पूर्ववत सुरु ठेवणे, जनतेच्या पैशाची सुरक्षा …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचे तापमान देशात सर्वाधिक उष्ण

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचे तापमान देशात सर्वाधिक उष्ण नागपूर –विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी पारा चाळीशी पार पोहोचला. सोमवारी ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी पारा चाळीशी पार पोहोचला. सोमवारी ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोल्यात ३९.५ आणि चंद्रपुरात ३९.४ अंश सेल्सिअस …

Read More »

ब्रम्हपुरी तील उमेद कर्मचाऱ्यांचे तहसीलदारा मार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

🔹स्वयंसहायता समुहांची मुख्यमंत्री यांना 4 लाख पत्रे,45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या अभियानात खोडा ब्रम्हपुरी(दि.18सप्टेंबर):- आज तालुक्यातील उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी ब्रम्हपुरी चे तहसीलदार श्री. विजय पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये तसेच चुकीचे आकलन करुन कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसुबा हानून पाडण्यासाठी राज्यभरातील स्वंयसहायता …

Read More »

तीन दिवस उलटून सुध्दा वृषालीची तब्येत गंभीरच

ब्रम्हपुरी(दि.9सप्टेंबर):- तालुक्यातील झिलबोडी येथील वृषाली दिगांबर शेन्डे या तीन वर्षीय बालिकेला दि. ०७ सप्टेंबरला पहाटे ४ वाजताच्या दरम्यान अत्यंत विषारी प्रजातींच्या पट्टेरी मन्यार सापाने दंश केल्यामुळे तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे व नंतर ख्रिस्तानंद रूग्णालयात दाखल करण्यात आले.ही बातमी दि. ०८ सप्टेंबरला जवळपास सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली. बातमीमध्ये वृषालीच्या वडीलांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले …

Read More »

पूरग्रस्तांसाठी सुरू आहे संघाचे प्रशंसनीय कार्य

ब्रह्मपुरी(दि.6सप्टेंबर):-कुठल्याही प्रकारच्या आपत्तीच्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आघाडीवर असतात. याचा प्रत्यय ब्रम्हपूरी तालुक्यातील पूरगस्तांच्या मदत कार्यात सर्वांना येत आहे. गोसेखुर्दचे पाणी मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत सोडल्याने आलेले भविष्यातील संकट ओळखून अगदी सुरूवातीपासूनच स्थानिक संघ स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांच्या मदत कार्यात कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता स्वत:ला मदत कार्यात झोकून दिले आहे. पूरस्थिती बिकट होती. गावागावात पूरग्रस्त अडकून पडले होते. त्यांना भर पूरामध्ये …

Read More »

गंगाबाई तलमले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

ब्रम्हपुरी(दि.५सप्टेंबर):- स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली, यंदा कोरोना महामारिमुळे कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित होते, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्या वर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाला प्रा. रुपेश पिल्लारें, प्रा. अतुल नंदेश्वर, …

Read More »

पुरामध्ये उध्वस्त झालेल्या लोकांच्या समस्या जाणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे एस.डी.ओ. यांना निवेदन

  ब्रम्हपुरी(दि.४सप्टेंबर):- ब्रम्हपुरी तालुक्यातील रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ने पूरग्रस्त गावांना भेटी देऊन त्यांची समस्या जाणून घेतल्या. व त्यांच्या समस्या लवकरात लवकर पारित व्हाव्या या करता रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी च्या वतीने, (एस. डी. ओ.) उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले, निवेदनाच्या काही मागण्या मान्य कराव्या असे रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी यांच्या वतीने करण्यात आल्या, ज्या पूरग्रस्तांच्या घरांची तथा शेतीची …

Read More »