Breaking News

भद्रावती

राष्ट्रवादी काँग्रेस चा केंद्र शासनाच्या इंधन दरवाढी विरोधात हल्लाबोल.

राष्ट्रवादी काँग्रेस चा केंद्र शासनाच्या इंधन दरवाढी विरोधात हल्लाबोल. नागपूर चंद्रपूर महामार्गावरील भद्रावती टप्प्यावर केले निदर्शने. भद्रावती- देशातील जनता गेल्या दिड वर्षापासुन कोरोना च्या संकटापासुन त्रस्त आहे कोराना रोगामुळे औषधे,रूगणालयचे खर्च,कडक संचारबंदी यामुळे समाजातील प्रतेक घटक आपआपाल्या उदरनिर्वहासाठी धडपड करीत आहे, अशा परिस्थितीत केन्द्र सरकार मदत करण्याऐवजी इंधन दरवाढ करूण जणतेची लुट करून सर्वसामन्य जनतेला नाहकत्रास देत आहे. आता रसायनिक …

Read More »

तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली,तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली

केपीसीएल प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर काम सुरू आयुधनिर्माण- भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण नुकतीच सुरू झाली आहे. या खाणीतील कामगारांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली. अखेर कंपनी व स्थानिक प्रशासनाच्या मध्यस्थीने लेखी आश्‍वासनाअंती खाण पूर्ववत सुरू करण्यात आली. 1 डिसेंबर 2020 ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कनार्टका एम्टा कंपनीचे काम सुरू झाले. सहा महिने लोटूनही कामगारांच्या …

Read More »

तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने केला हल्ला

भद्रावती, जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन व शेतोपयोगी साहित्य आणण्यासाठी जंगलात गेलेल्या ग्रामस्थांवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात दोन महिलांचा आणि एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. या तिन्ही घटना बुधवार, 19 मे रोजी भद्रावती तालुक्यातील आयधुनिर्माणी जंगल परिसर, सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी दिवाण तलाव परिसर तसेच सावली तालुक्यातील मंगर मेंढा परिसरात घडल्या. या वेगवेगळ्या घटनांत रजनी भालेराव चिकराम (रा. घोटनिंबाळा), सीताबाई …

Read More »

हॉटेल व्यवसायिकाची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या?

हॉटेल व्यवसायिकाची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या? भद्रावती प्रतिनिधी :- कोरोना संक्रमण झालेल्या व त्यामुळे रुग्णालयाच्या फी आणि औषधी खर्च याच्या बोझ्याखाली दबून आता आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यात व्यवसायिकांचे लॉक डाऊन मधे आर्थिक कंबरडे मोडले असल्याने हॉटेल भाजीपाला व इतर दुकानदार यांचे मनोधैर्य खचल्याने ते आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारत आहे अशीच एक घटना भद्रावती शहरातील गौतम नगर इथे …

Read More »

विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अॅटींजेन तपासणी मोहीम

विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अॅटींजेन तपासणी मोहीम तपासणी मोहिमेत एकुण 7 व्यक्तीचा अहवाल सकारात्मक चंद्रपूर, दि.11 मे: कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये तसेच संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून रस्त्यावरच अँटीजेन तपासणी करण्याची मोहीम  जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंदच्या काळात …

Read More »

भद्रावती पोलीसांनी दारू सह १० लाखांचा मूद्देमाल केला जप्त.

बरांज तांडा येथील तब्बल ४२ लाखांच्या कारवाई नंतर आठवड्यातून ही दुसरी मोठी करवाई. भद्रावती पोलीसांनी अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे धाडसत्र सुरू केले असून दिनांक २६ ते २८ दरम्यान बरांज तांडा परिसरात विशेष मोहीम राबवून तब्बल ४१,९०,००० रुपयाचा गूळ दारू गूळ सडवा व गूळ दारू काढण्याचे साहित्य असे मिळून मुद्देमाल जप्त केला होता आणि आज दिनांक …

Read More »

कामगारांना अंतीम न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही – हंसराज अहीर

बरांज कोल माईन्सच्या प्रकल्पग्रस्त व कामगारांना अंतीम न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही – हंसराज अहीर चंद्रपूर:- केपीसीएलच्या बरांज खुल्या कोळसा खाणीस जिल्हा प्रशासनाने दिलेली उत्खननाची परवानगी रद्द करावी या प्रमुख मागणीस घेवून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा करोडो रूपयांचा प्रलंबित मोबदला त्वरीत द्यावा, कामगारांचे थकीत वेतन तातडीने निर्गमित करावे, बरांज या गावाचे पुनर्वसन लोकभावनांचा आदर करून सुचविलेल्या स्थळावर अविलंब करावे या व इतर …

Read More »

अधिकार्‍यास लाच घेताना अटक

अधिकार्‍यास लाच घेताना अटक चंद्रपूर- जमिनीचे फेरफार करुन देण्याच्या कामासाठी 1 हजार 500 रुपयाची लाच स्वीकारणार्‍या भद्रावती तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकार्‍यास रंगेहाथ अटक करण्यात आली. प्रशांत नरेंद्रप्रतापसिंह बैस असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरूवार, 1 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. चंद्रपूर येथील रहिवासी तक्रारदार यांची चंदनखेडा साजा अंतर्गत चरूर घारापुरी येथे शेती आहे. या शेतजमिनीचे फेरफार करण्यासाठी …

Read More »

युवकाचा कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून मृत्यू

भद्रावती- गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या युवकाचा कोळसा खाणीच्या खड्डयात बुडून करुण अंत झाल्याची घटना भद्रावती पोलिस ठाणे अंतर्गत बेलोरा (किलोनी) या गावात सोमवार, 22 मार्च रोजी उघडकीस आली. तालुक्यातील बेलोरा (किलोनी) येथील रहिवासी पराग बंडू गाडगे (22) हा युवक 19 मार्चपासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. हा युवक भद्रावतीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेत होता. दरम्यान, 19 …

Read More »

थकित वीज तोडणी रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘वीरूगिरी’

भद्रावती- राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वीज वितरण कंपनीने थकित वीज जोडणी कापण्याचे अभियान सुरू केले आहे. हे अभियान थांबविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी रविवार, 14 मार्च रोजी भद्रावती येथील बसस्थानकालगत असलेल्या बिएसएनएलच्या मनोर्‍यावर चढून वीरूगिरी केली. मनोर्‍यावर चढून इम्रान खान व केतन शिंदे आंदोलन करीत आहेत. भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांच्या या आंदोलनाने तालुका प्रशासनात खळबळ …

Read More »