Breaking News

मूल

वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू  , अंमलनाला धरणाजवळ दगावल्या 25 गायी

वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू – अंमलनाला धरणाजवळ दगावल्या 25 गायी चंद्रपूर, बेपत्ता झालेल्या पावसाने बुधवारी तालुक्यात मेघगर्जनेसह दुपारी 2 वाजताच्या सुमारास हजेरी लावली. दरम्यान, वीज पडून खिर्डी शिवारात लक्कडकोट येथील 45 वर्षीय शेतकर्‍याचा मृत्यू झाला. वारलू रामटेके असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे. दरम्यान, कोरपना तालुक्यातील अंमलनाला प्रकल्पाजवळ 20-25 गायींचा मृत्यूमुखी पडल्या. त्या पाण्यात तरंगताना दिसल्या. तेव्हा वीज कडाडली आणि मुसळधार …

Read More »

चंद्रपूर मूल मार्गावर भीषण अपघात दोन इसम जागीच ठार, दारू बंदी उठल्यानंतर अपघातांची मालिका सुरू

चंद्रपूर मूल मार्गावर भीषण अपघात दोन इसम जागीच ठार दारू बंदी उठल्यानंतर अपघातांची मालिका सुरू चंद्रपूर मूल मार्गावर असलेल्या डोनी फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन इसम जागीच ठार झाले. ही घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. दुचाकीस्वार दारुच्या नशेत मुल वरून चंद्रपूर कडे जात होते तर चारचाकी वाहन बोलेरो पिकप ही चंद्रपूर वरून मुलकडे येत असल्याचे कळते. …

Read More »

सुशी दाबगावाच्या मामा तलावात मगर , बघ्यांची गर्दी

सुशी दाबगावाच्या मामा तलावात मगर , बघ्यांची गर्दी मूल, मूल तालुक्यातील सुशी दाबगाव गावानजिक असलेल्या माजी मालगुजारी तलावात शुक्रवार, 2 जुलै रोजी 5 फुटाचा मगर सापडला असून, त्याला बघण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुशी गावातील मामा तलावात मच्छी पालन होत असून, येथील मासेमारी समाज नेहमीच मासे मारीत असतात व पावसाळा आला की मास्याची बिजाई सोडत असतात. शुक्रवारी सकाळी …

Read More »

3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात मूल, तालुक्यातील भेजगाव येथील एका शेतकर्‍याकडून फेरफारकरिता 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बेंबाळ महसूल मंडळाचे निरीक्षक महादेव कन्नाके यास चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार, 21 जून रोजी दूपारी 12 वाजताच्या सुमारास रंगेहात पकडले. भेजगाव येथील शेतकरी आणि सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांच्याकडून फेरफारकरिता महादेव कन्नाके यांनी 5 हजार रुपयांची मागणी …

Read More »

जबरानजोत शेतकऱ्यांना त्रास दिला तर कायदा हातात घेणार:- राजू झोडे…

जबरानजोत शेतकऱ्यांना त्रास दिला तर कायदा हातात घेणार:- राजू झोडे… मुल:- मागील कित्येक वर्षापासून आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी जबरानजोत शेतकरी शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशा जबरानजोत शेतकऱ्यांना शेती पासून वंचित करण्याचे कट-कारस्थान वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद आणि वन अधिकारी करत आहेत असा आरोप राजू झोडे यांनी केला. मूल तालुक्यातील पारंपारिक आदिवासी व गैर आदिवासी शेतकरी यांना वनअधिकारी …

Read More »

मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू 

मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू              चंद्रपूर,दि.7 जून: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्र, जानाळा उपक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या डोणी नियतक्षेत्र-1 मध्ये 5 जून रोजीच्या विशेष निरीक्षणादरम्यान क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना सकाळी 10 वाजता वाघिण मृत अवस्थेत आढळली. सदर घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच घटनेच्या स्थळी भेट देऊन चौकशी केली. तद्नंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या एसओपी नुसार दि. 5 …

Read More »

डोणी जंगलात वाघिणीचा मृत्यू

डोणी जंगलात वाघिणीचा मृत्यू मूल- तोडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या बफर क्षेत्रातील मूल वनपरितक्षेत्रच्या नियत क्षेत्र डोणी-1 कक्ष क्रमांक 327 मध्ये शनिवार, 5 जून रोजी 10 वाजताच्या सुमारास एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृत वाघणीला चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचे दहन करण्यात …

Read More »

कोसंबी येथे ६ जून ला रक्तदान शिबीराचे आयोजन, शिवराज्य दिनानिमित्त ग्रामपंचायत व युवकांचा पुढाकार

कोसंबी येथे ६ जून ला रक्तदान शिबीराचे आयोजन शिवराज्य दिनानिमित्त ग्रामपंचायत व युवकांचा पुढाकार चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने नव्याने यंदापासून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस संपुर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थात गुढी उभारुन अभिवादन करुन साजरा करण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने हा सोहळा संपन्न व्हावा असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुल तालुक्यातील ग्रामपंचायत …

Read More »

गोवंशाची तस्करी करणारे तीन ट्रक ताब्यात, 82 जनावरांची सुटका , 7 जण अटकेत

  गोवंशाची तस्करी करणारे तीन ट्रक ताब्यात– 82 जनावरांची सुटका,– 7 जण अटकेत मूल, नागभीड-मूल-गोंडपिपरीमार्गे तेलंगणा राज्यात जनावरांची तस्करी करणारे तीन ट्रक पाठलाग करून पकडण्यात पोलिस विभागाला यश आले आहे. तब्बल 82 जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी 50 लाखांच्या तीन वाहनांसह 8 लाख 20 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला गेला. तर 7 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी …

Read More »

व्यापाऱ्यांना वेठीस धरून मताचे राजकारण सुरू आहे – मोतीलाल टहलियानी

  चंद्रपूर  : गत दिड वषांपासून कोरोना संसर्ग विषाणू परिस्थितीत व्यापारी वगाँस माेठ्या अडचणीत आणण्याचा घाट रचला जात असल्याचा गंभीर आरोप मूल व्यापारी जनरल असोशिएशन चे अध्यक्ष,माजी बाज़ार समिती सभापती मोतीलाल टहलियानी यांनी केला आहे .  कोरोनाचे नावाखाली सवं स्तरातील व्यापारी देशोधडीला लागला असतांना मात्र कुठल्याही राजकिय पक्षाने,नेत्याने अजूनही आपले तोंड उघडलेले नाही,शाशनस्तरावरून कुठल्याही सोयी सवलतीवर साधी चचॉ करण्याची  नैतीकता दाखविली …

Read More »